वेळकर फाऊंडेशनचा एक आनंदोत्सव, मुक्काम पोस्ट फणस पाडा, वाळवंड, जव्हार, पालघर.
हो आनंदोत्सवच !
या आदिवासी बांधवांना अती दुर्गम ठिकाणी दिवाळी फराळ, मिठाई, महिलांसाठी साड्या, घरच्यांसाठी, घरच्यांसाठी जेवणाचे जिन्नस, ब्लॅंकेट, स्वच्छतेसाठी खराटा झाडू अशा अनेक गृहोपयोगी वस्तूंचे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यात आले. त्यांनी मनमोकळेपणाने केलेला त्याचा स्विकार व गेल्याबरोबर केलेले सुस्वर तारफा वादनाने स्वागत, सर्व कसे घरच्या कुटुंबातीलच समारंभासारखे. आमच्या सोबत असलले आमचे सहकारी श्री. सौ. मनोज चावडा उभयता आपल्या सुकन्ये सह आणि प्रथमच आमच्या सोबत आलेले श्री. सुभाष पडवळ, श्री. मनोज ढेरे, श्री. अनंत मालवणकर, कु. तृप्ती पार्सेकर व निर्मला मेमोरियल फाऊंडेशन कॉलेज एन एस एस युनिट चे शिक्षक व स्वयंसेवक ही सर्व मंडळी भारवून गेली.
या वर्षी या आनंदोत्सवाचा आणखी एक भाग म्हणजे त्या पाड्यात असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गवंडा मॅडम यांच्या महत्वाच्या उपस्थितीत शाळेकरीता अद्ययावत प्रोजेक्टर भेट म्हणून देण्यात आला. त्याचे प्रात्यक्षिकही करून दाखवण्यात आले. ४३ पट असलेल्या या शाळेला तंत्रज्ञानाची गरज व त्यांची मागणी लक्षात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले.
शेवटी भावना विवश होऊन, त्यांच्या आग्रहास्तव, त्यांच्यासोबत सात्विक भोजनाने मन तृप्त केल्यावर त्यांच्या प्रेमापोटी त्यांनी जतन करून ठेवलेली त्यांची संस्कृती म्हणजेच त्यांचे तारफा नृत्य प्रत्यक्ष पाहण्याचे नेत्रसुख या निमित्ताने सर्वांना घेता आले.
त्यांची सोबत अशीच असावी असे वाटत असताना वेळेचे बंधन असल्यामुळे त्याच आनंदोत्सवात मग्न होवून परतीच्या प्रवासाला निघालो.खरंच धन्य झालो. दिवाळी सण स्मरणात राहील असा हा आनंदोत्सव साजरा केला.
या कार्यक्रमासाठी वेळकर फाऊंडेशन सोबत जोडले गेलेल्या खालील सर्वांचे मनापासून आभार.
- Rohit Warde
- Dipali Velkar
- Sujata Joshi
- Aniruddha Salvi
- Trupti Parsekar
- Rahul Velkar
- Smita Ogale
- Ramesh Pawar
- Darshana Parkar Madam
- Shailendra Jadhav
- Ganesh Shirodkar
- Yashwant Owhal
- Yashwant Jadyar
- Suryakant Velkar
- Ankush Parsekar
- Nikesh Durgam
- Vinay Patil
- Akshay Yadav
- Parsekar Parivar
- Sachin Manchekar
- Sanchita Kambali
- Deu Lakhan
- Lalit Bhuwad
- Rupesh Velkar
- Sonam Chindhe
- Prashant Raut
- Hemlata Gavit
- Subhash Naik
- Sharad Patkar
- Manoj Dhere
- Anant Malvankar
- Dhondi Shivalkar
- Nishant Acharekar
- Anil Sawant
- Narayan Pednekar
- Subhash Padwal
- Anant Kargutkar
- Mount Merry Nagari Sahakari Patpedhi
- Jayesh Jadhav
- B S Sarmalkar
- Manoj Chawda
- Sibal Chawda
- Isha Chawda
- Pankaj paul
- Shivshankar Prajapati
- Varun Samale
- Dr. Poonam Yadav
- Dolly Agarval
- Chetan Poojari
- Niraj Malvia
- Pankaj Shinde
- Brijesh Joshi
- Rishabh Desai
- Megha Juvekar
- Nirmala Memorial Foundation College, NSS Unit
चुकून कोणाचे नाव राहीले असल्यास कळवावे.






आनंद -आनंद वाटण हिच तर खरी दिवाळी आनंद वाटण ही सोपी गोष्ट नाही आणि तो पण वंचितासाठी वेळकर फाउंडडेशन च्या माध्यमातून हे फार मोठ कार्य वंचीतासाठी चाललेय हिच तर खरी मानवता आहे. ईश्वर इथेच भेटतो. या त्यांच्या कार्याला सलाम त्यांच्याकडून असेच कार्य उत्तरोत्तर घडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आपल्या या कार्यात खारीला वाटा उचलायला मिळाला हेच समाधान खूप खूप धन्यवाद .